ती


एकदा ती दिसली मला,
मला पहिले तिने,
पाहताच गेलो, पाहताच गेलो,
आम्ही जात पुढे पुढे.

बघता बघता ती,
माझ्या पुढे निघून गेली,
आणि पुढच्या वळणाः वरती,
पुन्हा झलक तिने दिली.

गेला तो दिवस तीचाच विचार करण्यात,
दुसरा दिवशीही तेच राहीले माझ्या मनात,
काही सुचत नव्हते तिच्याविंना दुसरे,
आता काही तरी होणार असे मला वाटले.

असे कितीतरी दिवस मी ढकळत गेलो,
आणि सारखा तोच क्षण आठवत गेलो,
ठरवले मी मनाशीच,शोधायचे पुन्हा तिला,
काहीही करून आता मिळवायचा तिचा पत्ता.

सुरूवात केली मी पुन्हा त्याच ठीकांना पासून,
एकडे फिरलो,तिकडे फिरलो,आठवत तो क्षण,
कॉलेजात बघितले,बागेत बघितले,
गल्लो गल्ली ,अगदी मंदिरही नाही सोडले.

नाही दिसली हो कुठे ती,हताश मी झालो,
खाली मान घालून मी माघारी निघालो,
तितक्यात आवाज़ आला मला मुलींच्या घोळक्याचा,
टाकला कटाक्षा मी,म्हणत शेवटाच चान्स हा मज़ा.

आणि सांगतो मी तुम्हाला होती तीच ती,
माझ्या मनातली , माझ्या आली समोर ती,
मग म्हणालो आता पाहून जरा हासूयात,
तिच्या मनात आहोत का आपण, हे जरा पाहुयात.

मी हसलो,ती हसली,आणि आता खात्री पटली,
म्हणतात ना हो,हसली म्हणजे मुलगी फसली,
तो दिवस मी विसरणार नाही कधी,
काय करू मी आता समजत नव्हते काही.

पुन्हा पुन्हा तेच घडले,आता सारखे नाही सांगत,
आता ही माझी होणार अशी खात्री होती पटत,
आता काही मी नव्हतो,जास्त थांबू शकत,
येणार्‍या वॅलिंटाइन डे ची,होतो वाट पाहत.

  1. #1 by Pravina - February 14th, 2008 at 12:26

    I call you Chupa rustam….. Now you know why? ;)

  2. #2 by Vjpratik - March 6th, 2008 at 08:22

    Mazyahi jeevnat asech kahi ghadle ahe me pan 14 feb chi vaat pahat ahe thanks

(will not be published)
  1. No trackbacks yet.